ऐटीत सिंहाला गोंजरायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात.

त्यामध्ये कधी प्राण्यांची हाणामारी असते, तर कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर अशातच सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे की, सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. सहसा सिंहाचा नादी कोणताच प्राणी लागत नाही. करण एकदा का सिंहाने ठरवलं की, तो त्या प्राण्यांची शिकार केल्याशिवाय त्याचा पिछा सोडत नाही.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देखील असंच काहीस झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका पार्कमध्ये एक व्यक्ती त्याच्यासोबत असलेल्या भल्यामोठ्या सिंहासोबत मस्ती करत आहे.

तो व्यक्ती त्या सिंहाला आपल्या हाताने गोंजारतही आहे. पंरतू काही वेळानंतर अचानक त्या सिंहाने त्या व्यक्तीवर हल्ला चढवला. हे सगळं इतक्या लवकर झालं की, त्या व्यक्तीला काय सुरू आहे हेही समजलं नसल्याचं लक्षात येतं आहे.

त्यानंतर त्या व्यक्तीच्या मदतीसाठी त्या पार्कमध्ये असलेला एक तरूण आला आणि त्यानी त्या सिंहाला बाजूला केलं. तसेच तो दोघ त्या सिंहाला ज्या प्रकारे हाताळत होते, त्यावरून एक गोष्ट समजतं आहे ती म्हणजे ते दोघेही त्या सिंहाचे मेनटोर असावेत.

त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CTji5C0HreU/?utm_source=ig_embed&ig_rid=941406cd-48fa-4a6d-b956-7f7639f4c9e5

महत्वाच्या बातम्या-

नवरा-बायकोने केला ‘हा’ अनोखा स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा ताजा भाव

भाजपला शह देण्यासाठी ‘या’ शहरात पवारांच्या तीन पिढ्या उतरल्या मैदानात!

भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मधुमेही रूग्णांंनी आहारात ‘या’ फळांचा समावेश करावा, साखर नियंत्रणात राहिल