नवरा-बायकोने केला ‘हा’ अनोखा स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | आता जवळजवळ दोन वर्ष होतील कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. आता कुठं ही परिस्थिती निवाळली असल्याचं दिसून येतं आहे.

कोरोना रोगाने माणसांमध्ये खूप चांगला बदल झालेला आपण सर्वांनी पाहिला असेल, तो म्हणजे सगळे लोक हेल्थ कॉन्शिअस झाले आहेत. आपल्या आरोग्याची सगळे लक्षपूर्वक लक्ष देत आहेत.

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. तसेच आपल्याला माहित आहे की, महिलांपेक्षा जास्त पुरूषांमध्ये शारिरीक बल हे जास्त असतं.

परंतू याच वाक्याला तफावत असणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक महिला आपल्या पतीला आपल्या शारिरीक बलाचा उपयोग करून उचललं असल्याचं पाहायला मिळतं आहे.

घरामध्ये एक महिला भिंतीला पाठ टेकवून खूर्चीवर बसतो तशी बसली आहे. विशेष म्हणजे तिच्या पायांवर तिचा नवरा चढण्याचा प्रयत्न करत आहे. काही क्षणातच तिचा नवरा आपल्या शरिराचा संपूर्ण भार टाकून तिच्या पायांवर उभा राहिला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

तसेच नवरा-बायकोचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांनी या व्हिडीओला कमेंट्स देखील केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CUcG6EaFG5M/

महत्वाच्या बातम्या-

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा ताजा भाव

भाजपला शह देण्यासाठी ‘या’ शहरात पवारांच्या तीन पिढ्या उतरल्या मैदानात!

भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मधुमेही रूग्णांंनी आहारात ‘या’ फळांचा समावेश करावा, साखर नियंत्रणात राहिल

वृद्ध दाम्पत्याचा चिलम फुंकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ