मुंबई | शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले आहे. दोनही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय अशांतता आहे.
दोन दिवसांपूर्वी दापोली येथे झालेल्या सभेत शिवसेनेचे माजी मंत्री आणि आता शिंदे गटातील आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अर्वाच्च आणि रोखठोक भाषेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.
त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर अर्वाच्च आणि पातळी घसरवत टीका केली. दोनही गट एकमेकांवर विश्वासघात केल्याचा आरोप करत आहेत.
या घसरलेल्या टीकांवर आणि आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी टीकाकारांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे.
रामदास कदम यांनी यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली होती. अंबादास तुम्ही पहिले त्याला (आदित्य) सांगितले पाहिजे, अगोदर लग्न करुन बघ. मग बायको आल्यावर संसार कसा ते कळतो, असे कदम म्हणाले होते.
त्याचबरोबर नुसती दाढी वाढवून काय उपयोग, लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार कसा असतो ते, असे रामदास कदम म्हणाले होते. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता.
तुम्ही राजकारणापुरते राजकारण करा. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राला तशी कोणतीही शिकवण नाही. त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे, असे पवार म्हणाले.
बेरोजगारीवर बोला. वैयक्तिक टीका-टिपण्णी का करत आहात? कुणी दाढी वाढवावी? कोणी वाढवू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण त्यावर बोलायचे काय कारण आहे? असा प्रश्न अजित पवारांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मनसेची शिवसेनेवर मोठी टीका; “शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर जनता…”
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस…
“लग्न केवळ शारीरिक सुखासाठी नसते, तर…”; उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण
दसरा मेळाव्याबाबत संजय राऊतांच्या महत्वाच्या सूचना; म्हणाले, ”शिवसैनिकांनी शिवाजी पार्क…”