Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरे-अजित पवारांमध्ये रंगली जुगलबंदी; CM म्हणाले, “अजितदादा तुम्ही जिथं आहात तिथं…”

ajit pawar and uddhav thackeray e1582103136487

मुंबई | राज्यात विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे आमदार सरकारवर नाराज असल्याची वक्तव्य अनेकदा समोर आली आहेत. असं असलं तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद नसल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. हे दोन्ही नेते आज जीएसटी भवनाचं उद्घाटनात बोलत होतेय

कार्यक्रमादरम्यान अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना आमच्या कार्यक्रमाला येत नाहीत म्हणून नाराजीच्या बातम्या येतात, असं म्हटलं होतं.

पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी चांगलीच फटकेबाजी केली आहे. विरोधकांना आणि सरकारमधील इतर मंत्र्यांना देखील संदेश दिल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत, अलबेल नाही, वरिष्ठांशी संपर्क नाहीत अशा बातम्या मुद्दामहून पेरल्या जातात. महाविकास आघाडीत कसलाही मतभेद नाही, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना सांगू ईच्छितो की आमच्यात कसल्याही प्रकारचं काही नाही. सर्वकाही अलबेल आहे. सरकार व्यवस्थित काम करतय, असं ठाकरे म्हणाले आहेत.

अजितदादा तुम्ही जिथं आहात तिथं मी येण्याची गरज नाही, आपण एकत्रितच आहोत, असं ठाकरे म्हणाले आहेत. अजित पवार चांगलं काम करत आहेत असंही ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात ज्या प्रकारे जीएसटीची प्रणाली व्यवस्थित काम करत आहे त्याचं सर्व श्रेय हे अजितदादांना आहे, या शब्दात उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Stock market : आता शाळेतच विद्यार्थ्यांना मिळणार ‘शेअर मार्केट’चे धडे

“उसाची शेती वाढल्यानं मला काळजी वाटतेय”

“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं” 

‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव, म्हणाले…