पुणे : शेतकरी पीकविमा संदर्भात सभागृहात दातखीळ बसलेली शिवसेना ही बाहेर येऊन मोर्चे काढून नाटक करत आहे, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ते गुरुवारी पिंपरीमध्ये बोलत होते.
लोकांनी निवडून दिलेलं सरकार ते पाडत आहेत. आणि ते लोकशाहीला घातक आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपलाही लक्ष्य केलं आहे.
सेना-भाजप हे अमिष दाखवून इतर नेत्यांना आपल्या पक्षात घेतात, असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.
मुंबईतील डोंगरी भागातील इमारत कोसळल्याने 13 जण दगावले आहेत. ती इमारतही खेकड्यांनीच पाडली का? असा उपरोधिक प्रश्न अजित पवारांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी विनंती वजा सूचना अजित पवारांनी केली आहे.
लोकसभेला मोदी लाट होती. आगामी विधानसभेला पूर्ण ताकदीनिशी सामोर जावं लागणार आहे, असं पवार म्हणाले. इतर समविचारी पक्षांशी बोलणी सुरु असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या-