‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले

पुणे | राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी लोककल्याणकारी राज्याची उभारणी केली.

लोककल्याणकारी राज्याच्या माध्यमातून शिवरायांनी विविध क्षेत्रांचा विकास करण्यावर भर दिला होता. शिवरायांना जगातील सर्वोत्तम व्यवस्थापक देखील म्हटलं जातं.

शिवरायांच्या कर्तुत्वाची साक्ष देत उभा असणाऱ्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी सरकारवर आहे. शिवरायांच्या इतिहासाला आपल्या डोळ्यांनी अनुभवण्यासाठी गड किल्ल्यांचं संवर्धन महत्त्वाचं आहे.

छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचं जतन करत असताना हेरिटेज स्ट्रक्चरला कसलाही धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार भाषण करत असताना मध्येच एका व्यक्तीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावर अजित पवारांनी त्या व्यक्तीला चांगलंच सुनावलं आहे.

तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का?, मराठा आरक्षण मिळाले पाहीजे हिच आमची भूमिका आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. हा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे इथे असलं चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांची पोरटे नाहीत का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?, असा सवाल अजित पवारांनी त्या व्यक्तीला विचारला आहे.

दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मराठा आरक्षणावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळालेला आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले