महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो ओवेरियन कॅन्सर

मुंबई | कॅन्सर हा असा आजार आहे की ज्यावरती वेळेवर उपर केचाले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात. भविष्यात त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. यामुळे महिलांचे गर्भाशय आणि ट्युब नष्ट होऊ शकते.

ओवेरियन कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर या आजारामध्ये महिलांच्या गर्भाशयामध्ये छोट्या आकाराच्या गाठी तयार होत असतात.

ओवेरियन कॅन्सरची लक्षणं खूप सर्वसामान्य असतात. त्यामुळं अनेकदा महिलांचं या आजाराकडे दुर्लक्ष होतं.

मासिक पाळी वेळेवर न येणं, अति लठ्ठपणा, पीसीओडी, थायरॉयड यांसारख्या समस्या महिलांमध्ये पहायला मिळतात. वेळेवर पाळी न येणे, कमी वयात पाळी येणे ही ओवेरियन कॅन्सरची लक्षण आहेत.

मासिक पाळीत दिवसभरात जास्त रक्तप्रवाह होणे, कंबर आणि योनीच्या भागांत वेदना होत असल्यास योग्य ती तपासणी वेळेत करणं गरजेचं असतं. दुर्लक्ष केल्याने याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

लघवी करताना मूत्राशयामध्ये वेदना होणे, वारंवार लघवी लागणे, लघवी करताना जळजळ होणे हा त्रास देखील महिलांमध्ये पहायला मिळतो. याकडे दुर्लक्ष केल्यामुळेही ओवेरियन कॅन्सर होऊ शकतो.

ओवेरियन कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आणि या आजारातून कायमची सुटका मिळवण्यासाठी योग्य त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…”