जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…

मुंबई | राजकीय वर्तुळात नेहमीच आरोप-प्रत्यारोप पहायला मिळतात. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या वक्तव्यावर राजकारण पेटल्याचं पहायला मिळत आहे.

आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजप (BJP) आक्रमक झालं असून जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते देखील आव्हाडांच्या या वक्तव्यावर नाराज असल्याचं दिसतंय.

जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावरून आता राजकारण चांगलंच पेटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तर द्यायला मी मोकळा नाही. त्यांनी काय म्हटलं हे त्यांनाच विचारत जा, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो, असं म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना सल्ला दिला आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी आरक्षणावर देखील भाष्य केलं आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही आता तो मध्य प्रदेशमध्ये लागू होत आहे. याविषयावर कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर

मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही

नागपूरात ट्रकची बाईकला जोरदार धडक; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!