पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरूद्ध निवडणुका लढवल्या. त्यानंतर दोन्ही मित्रपक्षाचा वाद विकोपाला गेला होता.

2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चांगलाच वाद झाला होता.

मुख्यमंत्रीपदाचा तिढा न सुटल्यानं राज्यात शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचं (NCP) महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झालं. त्यानंतर देखील शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

अशातच आता शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येवू शकतात. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचं नातं आहे, असंही अब्दूल सत्तार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा नितीन गडकरींचा खूप सन्मान करतात. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर नितीन गडकरी यांनी युती करण्याचा निर्णय घेतला, असं वक्तव्य देखील अब्दूल सत्तार यांनी ककेलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरींचा निर्णय मान्य केला तर प्रश्नच मिटेल, असंही अब्दूर सत्तार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता चांगलंच राजकारण तापल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…

पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर

मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही