भाजप आणि मनसे युती होणार का? सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केला खुलासा

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी कोणताही नवीन पक्ष स्थापन केला नाही किंवा कोणत्याही पक्षात प्रवेश देखील केला नाही. त्यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला आहे.

त्याचबरोबर त्यांनी भाजपसोबत सरकार देखील स्थापन केले. पण भाजपात प्रवेश केला नाही. त्यामुळे सध्या त्यांचा गट ‘ना घरका, ना घाटका’ अशा स्थितीत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या अनेक याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) प्रलंबित आहेत.

दरम्यानच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तसेच भाजप पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती.

त्यामुळे आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप आणि मनसे (BJP and MNS) युती करणार का, अशा स्वरुपाच्या चर्चांना उधाण आले होते.

आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी याबाबात एक माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुका लढविण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचे देशपांडे म्हणाले.

यावेळी त्यांना भाजप आणि शिंदे गटासोबत युतीचे विचारण्यात आले. त्यावेळी देशपांडे म्हणाले, ही पक्षाची अंतर्गत बैठक होती. त्यामुळे आत काय चर्चा झाल्या, ते आम्ही सांगू शकत नाही.

आमच्या पक्षाचे निर्णय राज ठाकरे घेतात, भाजप घेत नाही, असे उत्तर संदीप देशपांडे यांनी दिले तर आगामी सर्व निवडणुका मनसे स्वबळावर लढविणार असल्याचे देखील देशपांडे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

बच्चू कडू यांना अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधानांना फोन, म्हणाले…

उत्तर प्रदेशात भाषणादरम्यान अमित शहांची जीभ घसरली, म्हणाले…

दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; खाद्यतेलांच्या किंमतीत घट, जाणून घ्या सविस्तर वृत्त