‘हे लोकशाहीत चालतं का?’, अजित पवारांनी राज्यपालांना सांगितला लोकशाहीचा धडा

मुंबई | 12 आमदारांच्या यादीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खडेबोल सुनावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 12 आमदारांची यादी पाठवली होती. त्याला आज वर्ष झालं. मात्र यावर अजून निर्णय झाला नाही. हे लोकशाहीत बसतं का?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

राज्यपालांचे कुठलेही अधिकार कमी केले जात नाहीत. कुलगुरूंच्या निवडीसंदर्भात जी समिती आहे. ती पाच सात जी काही नावे असतील ती सिलेक्ट करेल. जी नावे योग्यतेची वाटतील ती आल्यावर सरकार त्यातून दोन नावं राज्यपालांकडे पाठवतील, असं अजित पवार म्हणाले.

राज्यपाल त्यातून एक नाव त्याचे प्रमुख म्हणून फायनल करायचे आहे. म्हणजे सरकार पाच, सात नाव ठरवणार नाही. जी समिती आहे ती समिती ठरवणार आहे. समितीकडून सरकारकडे येणार आहेत. त्यातून दोन नावं सरकार राज्यपालांना पाठवणार आहे. त्यात कुठलं आलं राजकारण, सरकारचा हस्तक्षेप कसा येतच नाही, असा दावा त्यांनी केला.

आरोप कोणीही करत आहे. बिनबुडाचे आरोप होत आहेत. काही लोकांना आरोपांशिवाय काही राहिलंच नाही. याबद्दल ते बोलतात, असा रोषही अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

170 सदस्यांचा पाठिंबा असलेल्या सरकारने ही नावं पाठवली. त्यावरही अजून निर्णय झाला नाही. ते कशात बसतं. हे योग्य आहे का, हे लोकशाहीत चालतं का, याचं आणि त्याची मी तुलना करत नाही. तो अधिकार राज्यपालांचाच आहे. मात्र, लोकशाही पद्धतीने नावं आल्यानंतर ती नावं जी काही नियमावली ठरवली आहे, त्यात बसतात का हे चेक करून त्यांना आमदार म्हणून बसण्याची संधी दिली पाहिजे, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.

आम्ही सर्व बसून काय करावं यावर चर्चा करायचो. केंद्राकडूनही डाटा मागितला. शेवटी सर्वोच्च न्यायालयातही गेलो. कोर्टाचा निकाल मानायचा असतो. तिथेही डाटा मिळाला नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.

आम्ही आयोगाला सर्व खर्च देण्याची तयारी दाखवली. त्यांना निधी उपलब्ध करून दिला. अर्थसंकल्पातही तरतूद करणार. पुरवणी मागण्यात करू. किती मंजूर करायचा हा कॅबिनेटचा अधिकार आहे. जेवढा निधी लागेल तेवढा द्यायचा, निधीची कमतरता आहे म्हणून आयोगाला गतीने काम करता येणार नाही असं होता कामा नये, असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश! 

“शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे ठाकरे सरकार चालतंय तोपर्यंत…” 

मोठी बातमी! ठाकरे सरकारला एकाच दिवशी सलग दुसरा झटका 

रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरेंचं ट्विट, म्हणाले… 

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका