‘हे रात्री बावचळून उठतात आणि….’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

मुंबई | शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने शिवसेनेला मोठे भगदाड पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपचा आश्रय घेतला आणि राज्यात नवे सरकार स्थापन केले.

त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी त्यांच्यावर सतत टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीका केली आहे.

मागे विधानसभेच्या पावसाठी अधिवेशनाच्यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर “50 खोके एकदम ओके” अशा घोषणा महाविकास आघाडीने दिल्या होत्या. त्यावेळीचे अधिवेशन भांडण आणि मारामाऱ्यांनी विशेष गाजले.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरीवरुन चांगली झडती घेतली. राज्य सरकार कोणाच्या दबावाखाली काम करते का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

50 खोके आणि एकदम ओके म्हंटले की यांना मिरच्या झोंबतात, असे पवार म्हणाले. तसेच यांना गद्दार म्हंटले तरी यांना राग येत असल्याचे पवार यावेळी भाषणात म्हणाले.

शिंदे गटातील लोक रात्री बावचाळून उठतात आणि खोके, खोके, खोके ओरडतात. अरे कशाचे खोके आणि काय खोके? असा मिश्किल टोला अजित पवार यांनी भाषणादरम्यान लगावला.

तसेच यावेळी त्यांनी वेदांता फॉक्सकॉनवर (Vedanta Foxconn) देखील भाष्य केले. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पूरेपूर प्रयत्न केले असल्याचे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

रामदास आठवलेंची राहूल गांधींच्या “भारत जोडो” यात्रेवर कवितेतून टीका

“मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदींना निस्तरावे लागत आहे”, काँग्रेसचा खोचक टोला

“भाजपसोबत युती करताय, जरा जपून”; उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरेंनी इशारा

अजित पवार शिंदे गटावर संतापले; म्हणाले, “यांना आम्ही गद्दार म्हंटले की…”

“देवी-देवतांनी मला सांगितले, डोन्ड वरी, जा भाजपमध्ये“