रामदास आठवलेंची राहूल गांधींच्या “भारत जोडो” यात्रेवर कवितेतून टीका

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी “भारत जोडो” (Bharat Jodo) यात्रेचे आयोजन केले आहे. ते कन्याकुमारीरपासून काश्मीरपर्यंत पायी पदयात्रा करणार आहेत.

त्यावर रिपाई (RPI(A)) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केले. रामदास आठवले यांनी राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे.

राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आठवलेंनी भारत तोडो यात्रा म्हंटले आहे. त्याबरोबर त्यांनी राहूल गांधी यांच्या या यात्रेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही म्हंटले आहे.

इंदोर (Indore) येथे बोलताना रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी अंदाजात कवितेच्या माध्यमातून राहूल गांधी यांच्या यात्रेची खिल्ली उडविली आहे. या यात्रेत कोणताच दम नाही, असे देखील आठवले म्हणाले.

विविध जाती, धर्म आणि भाषा असलेल्या या भारत देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. B. R. Ambedkar) फार पूर्वीच जोडून ठेवले आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ च्या माध्यमातून भारताला एकत्र जोडत आहेत.

तसेच राहूल गांधी यांनी कितीही यात्रा काढल्या तरी जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत, तोपर्यंत राहूल गांधी यांना राजकीय सफलता मिळणार नाही, असे देखील आठवले यावेळी म्हणाले.

काँग्रेस पक्षातील लोकांना राहूल गांधी यांचे नेतृत्व पसंत नाही. त्यामुळे गोव्यातून देखील अकरा पैकी आठ आमदार आणि त्यांच्यात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदींना निस्तरावे लागत आहे”, काँग्रेसचा खोचक टोला

“भाजपसोबत युती करताय, जरा जपून”; उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरेंनी इशारा

“देवी-देवतांनी मला सांगितले, डोन्ड वरी, जा भाजपमध्ये“

अजित पवार शिंदे गटावर संतापले; म्हणाले, “यांना आम्ही गद्दार म्हंटले की…”

“अजित पवारांना मुख्यमंत्री करा”, जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंद्यांना काय दिली ऑफर?