“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कुणीही येऊन बसतं, त्यांना म्हटलं तुला 145 आमदारांचा…”

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सरसकट सर्व आमदारांना झापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आपण इथे कुत्री, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाहीत, याची जाणीव ठेवली पाहिजे, असं अजित पवार म्हणालेत.

प्राण्यांचा आवाज काढणं हा मतदारांच्या विश्वासाला तडा जाणं आहे. त्यांचा अपमान करणं आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख प्रक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेतली पाहिजे, असं अजित पवारांनी म्हटलंय.

विधीमंडळाचा सदस्य सभागृहात कसा वागतो, कसा बोलतो, आवारात त्याचं वर्तन कसं आहे. सार्वजनिक जीवनात कसा वावरतो, या सगळ्यावर त्याची स्वतःचीच नाही तर विधीमंडळाची प्रतिमा ठरत असते. याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षात सभागृहातील सदस्यांच्या वर्तनामुळे आपल्या सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच धक्का पोहोचला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे, असं अजित पवार म्हणालेत.

तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाहीत. कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. पण सर्वांनी शिस्त पाळा, असं म्हणत अजित पवारांनी सगळ्यांना सुनावलं.

क्रॉसिंग तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे, काय आहे हेच माहीत नाही. कसंही क्रॉसिंग केलं जातं. तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोण तरी बोलत असतात. अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचं असतं. जातानाही नमस्कार करायचा असतो, असंही अजित पवारांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-  

“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत” 

मधुमेह असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर 

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण! 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर 

मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय