शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अनेक जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना नुकतंच कोरोना झाल्याचं समोर आलं.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांना सोमवारी कोरोना सदृश्य लक्षणं जाणवायला सुरूवात झाली होती. लक्षणं जाणवताच वर्षा गायकवाड यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे.

‘मला काल कोरोनाची प्राथमिक लक्षणं जाणवत होती त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. आज माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे’, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.

वर्षा गायकवाड यांना सौम्य लक्षणं जाणवत असून त्या सध्या विलगिकरणात आहेत. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

रविवारी भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर सोमवारी के. सी. पाडवी यांचा कोरोना अहवाल देखील पॉसिटिव्ह आला होता.

विधानसभेतील 32 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

एकापाठोपाठ एक अनेक जणांना कोरोनाची लागण होत आहे. वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सर्वच स्तरावरून खबरदारी बाळगण्याचं आवाहन कऱण्यात येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”

राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

“वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”

…तर राज्य सरकारलाही राजकीय पावलं टाकावी लागतील- संजय राऊत

मधुमेह असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर