कोण अजित पवार?, मी ओळखत नाही- नारायण राणे

कोल्हापूर | संतोष परब हल्लाप्रकरणात कणकवली पोलिसांच्या कारवाईला सध्या प्रचंड वेग आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली.

या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप असणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

नारायण राणे नागपूरातील दौरा अर्धवट सोडून गोव्यात परतले होते. त्यानंतर गोवा विमानतळावर नारायण आणि नितेश राणे यांची भेट झाल्याची माहिती होती. नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल दिवसभर त्यांचा फोन नॉट रिचेबल होता.

अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची चर्चा सुरु होती. या सगळ्या घडामोडींमुळे सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. अशात नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना नारायण राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

अजित पवार यांनी नुकतेचं म्याव म्याव आवाज काढण्यावरुन नितेश राणे यांना नाव न घेता टोला लगावला होता, त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले कोण अजित पवार मी ओळखत नाही.

ज्या अजित पवारांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला त्यांच्याबद्दल काय विचारता, असं म्हणत नारायण राणेंनी अजित पवारांना लक्ष केलं आहे.

दरम्यान, नितेश राणे कुठे आहेत मला माहितीये पण मी का सांगू? त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचं राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-  

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कुणीही येऊन बसतं, त्यांना म्हटलं तुला 145 आमदारांचा…” 

“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत” 

मधुमेह असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर 

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण! 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर