मुंबई | मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णवाढीनं कमालीचा वेग पकडला आहे. कोरोनाचा नवा विषाणू पुन्हा एकदा गुणाकार करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आकडेवारीतून पाहायला मिळालंय.
एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन (lockdown) लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी लॉकडानऊबाबत भाष्य केलं आहे.
तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे असून मंगळवारी राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.
सोमवारीही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली होती. देशासह राज्यात पुन्हा मोठी रुग्णवाढ होऊ लागल्यानं प्रशासनही धास्तावलंय. सर्व यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर आल्या आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देशासह, राज्याच्या डोक्यावरही कायम आहे.
गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता मात्र पुन्हा अशी स्फोटक आकडेवारी समोर येऊ लागल्याने पुन्हा धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाल्याचं समोर आलं आहे, कारण एकट्या मुंबईतली आकडेवारी 1377 आहे, त्यामुळे ही गेल्या काही महिन्यातली स्फोटक वाढ आहे.
सार्वजनिक ठिकाणी पुन्हा होणारी तुफान गर्दी आणि लोकांचा निष्काळजीपण यामुळे ही आकडेवारी एवढी वाढली आहे. राज्यात दिवसभरात 22 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध
“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”
काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव