मुंबई | अभिनेता सलमान खान याने नुकताच त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. सर्वांच्या लाडक्या भाईजानला चाहत्यांनी व अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर एका भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत. या पार्टीत फक्त सलमानचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच होते.
या भव्य पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले. अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख हिने देखील सलमान खानच्या पार्टीतील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
जेनेलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान आणि जेनेलिया अगदी बेभान होऊन डान्स करत आहेत. सलमान-जेनेलियाचा डान्स व्हिडीओ अगदी काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सलमान व जेनेलिया दोघांनीही मॅचिंग कपडे घातले आहेत. मॅचिंग कलरचा टी-शर्ट व ब्लू डेनिम जीन्स घालून सलमान व जेनेलियाचा तूफान डान्स सुरू आहे.
जेनेलिया व सलमानच्या या डान्स व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांना हा भन्नाट डान्स आवडला असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
27 डिसेंबर रोजी सलमानचा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या एक दिवस आधीच सलमानला सर्पदंश झाला होता. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
उपचारानंतर सलमानला घरी सोडण्यात आलं. त्यानंतर सलमानने त्याचे जवळचे मित्र व कुटुंबीयांसोबत त्याचा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा केला.
या बर्थडे पार्टीचे अनेक व्हिडीओ समोर आले पण सलमान आणि जेनेलियाच्या डान्स व्हिडीओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ
हातातोंडाशी आलेला घास गारपिटीनं गेला! राज्यातील ‘या’ भागांना मोठा फटका
अंडी खाल्ल्यानं डायबिटीज होतोय का?; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
सभागृहात गदारोळ! ‘बेशरम सरकार’च्या घोषणा देत भाजप आमदारांचा गोंधळ
पंतप्रधान मोदी म्हणतात, “बॉक्सभरुन नोटा सापडल्यात तर मला…”