मुंबई | कोरोना महामारीचा परिणाम गेल्या दीड वर्षात अवघ्या जगावर झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला सुरूवात झाली असं वाटायला लागलं की लगेच ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटनं सर्वत्र धुमाकुळ घातला आहे.
राज्यातील कोरोना संकटं वाढताना पहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतं आहे. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे.
आज दिवसभरात राज्यात 2 हजारच्या पुढं रूग्णसंख्येत वाढ झाल्यान सर्वत्र खळबळ माजली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
राज्यभरात आज दिवसभरात 2 हजार 172 नवीन करोनाबाधित आढळले असून, 1 हजार 98 रूग्ण करोनामुक्त झाले. 22 करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
एकट्या मुंबईत 1 हजार 377 नवीन करोनाबाधितांची आज नोंद झाली. तर 338 रूग्ण करोनातून बरे झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील सक्रिय केसेसची संख्या 5 हजार 803 आहे.
मागील काही दिवसात रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून सातत्यान हजाराच्या घरात ही संख्या होती पण आज अचानक ही संख्या दोन हजाराच्या पुढं गेल्यानं संकट वाढत असल्याची चिन्ह आहेत.
राज्यातील कोरोनाच्या वाढता प्रभाव पाहाता सरकारनं सर्वांन सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात सध्या नाईट कर्फ्यू लागू असल्यानं रात्रीच्या वेळी पार्टी करण्यावर बंधन आहेत.
ओमिक्राॅनचा वाढता प्रभाव पहाता देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. वयोवृद्धांना आता बुस्टर डोस देण्यात येणार आहे. परिणामी सरकार कोरोना विरूद्धचा लढा अधिक तीव्र करत आहे.
दरम्यान, राज्यातील रूग्णसंख्या वाढल्यान सध्या सरकार युद्धपातळीवर कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा करत आहे. राज्यातही लवकरच लहान मुलांना लस देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध
“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”
काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव
नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे