180 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या पोलिसांना घरं देणार- अजित पवार

पुणे | पोलिसांना चांगल्याप्रकारचं घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यभरातील मुंबई, पुणे, पनवेल सारख्या इतर भागांमध्ये नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

पोलीस अवघ्या 180 स्क्वेअरफूटच्या घरात राहात आहेत. ते आपला कायदा आणि सुव्यवस्था बघतात. आपल्यासाठी 24 तास राबतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मेट्रो कामासाठी पैसे दिले गेलेले नाहीत. गेल्या सरकारने ते काम केलं नाही. सर्व खात्यांना निधी द्यायचा आहे. कोणत्या खात्याला किती निधी द्यायचा? ते मी बघत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लागणारी रक्कम गृहित धरुन बाकीच्या कामांना कितपत निधी द्यायचा? याबाबत माझे कामकाज सुरु आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या मी सर्व विभागांचा आढावा घेत आहे. याविषयावर चर्चा करतोय आणि अधिकाऱ्यांशी बोलत आहे. अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे? हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्य बातम्या-