संभाजी राजेंनी उपोषण करू नये, चर्चा करून मार्ग काढण्यात येईल- अजित पवार

मुंबई | सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहे. या संस्थेत भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. तसेच, संभाजी राजेंनी उपोषण करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांना केलं आहे.

सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात उद्या खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे सारथी संस्थेच्या बाहेर उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनाबाबत अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेतली. यानंतर सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्याप ण जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहेत, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-