नवी दिल्ली | ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांसोबत जाण्याचा दीपिकाला अधिकार आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे. त्या दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ल्याच्या घटनेविरोधात निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीपिका पदुकोण हीने पाठिंबा दर्शवला आहे. यावरुन तिला अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागत आहे. तसेच आता स्मृती इराणी यांनी देखील दीपिकावर शरसंधान साधलं आहे.
मला जाणून घ्यायचं आहे की अखेर दीपिका राजकीयदृष्ट्या कोणाशी जोडली गेली आहे. ज्याने ही बातमी वाचली असेल त्या प्रत्येकाला हे जाणून घ्यायला आवडेल की दीपिका आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये काय करीत होती, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दीपिकाने सन 2011 मध्ये आपला काँग्रेसला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ज्या लोकांना तिने जेएनयूत गेल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे त्यांना ही गोष्ट माहिती नाही, असं स्मृती इराणी यांनी यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाजन-दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा! – https://t.co/fLBH1TGwf0 @girishdmahajan @raosahebdanve @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते पार पडणार श्रीशिवशंभू राज्याभिषेक – https://t.co/VvVl9RaYlG @YuvrajSambhaji
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
भाई, जाट हूॅं अंधभक्त नहीं; ट्रोल करणाऱ्याला विजेंदर कुमारचा पंच! – https://t.co/CiQm2PK7UM @boxervijender
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020