शिंदे आणि फडणवीस यांनी एक शब्द फेमस केला आहे, तो म्हणजे… – अजित पवार

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे युती सरकार आहे. नुकताच त्यांचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात 18 मंत्री शपथबद्ध झाले.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील नऊ आणि भाजपच्या नऊ आमदारांना यावेळी संधी मिळाली. त्यांनी अद्याप खाते वाटप केले नाही. आणि जिल्ह्यांना पालकमंत्री देखील नेमले नाही.

त्यावरुन शिंदेंना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोपरखळी मारली आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना कोणी विचारले, खातेवाटप केव्हा होणार? की ते एकच सांगतात ‘लवकरात लवकर’, असे पवार म्हणाले.

लवकरात लवकर हा त्यांचा आवडता शब्द झाला आहे. मंत्रिमंडळाला विस्तार आणि रखडलेले खातेवाटप यावरुन विरोधी पक्ष सरकारच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाला उशिर का होत आहे, हे फक्त शिंदे आणि फडणवीसांना माहिती असेल. खरे पाहता आता लवकरात लवकर खाते वाटप होणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले.

येत्या 17 ऑगस्टला विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे आता थोडेच दिवस उरले असताना, हे खातेवाटप झाले पाहिजे. अधिवेशनात प्रश्न विचारले जातात, त्यावेळी त्या प्रश्नाला संबंधित खात्याचा मंत्री उत्तरदायी असतो, पण आता तो नसल्याने कामकाजात अडथळा उद्भवू शकतो, असे अजित पवार म्हणाले.

या दोघांचा एक आवडता शब्द झाला आहे. लवकरात लवकर. काल मी दूरदर्शनवर फडणवीसांचे वक्तव्य ऐकले, ते म्हणाले खातेवाटप लवकरात लवकर होणार आहे. एकनाथ शिंदे देखील लवकरात लवकर करत आहेत, असे पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मराठी माणसासाठी शिवसेना (Shivsena) स्थापन केली. मुंबईत शिवसेनेची पाळेमूळे रुजली आहेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना अल्पकाळ यश तर मिळाले. पण नंतर कोणी निवडून देखील आले नसल्याचे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

आमच्याकडे पोलीस भाड्याने मिळतील, पोलीस स्टेशन सुद्धा बूक करु शकता

जात पडताळणी समितीचा समीर वानखडे यांच्याबाबत मोठा खुलासा

“आमिषाला बळी पडू नका”, माजी नगरसेवकांना पक्षप्रमुखांचा सल्ला

“मला तर हे 2019 ला कळाले होते” – उद्धव ठाकरे

आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर? वाचा काय म्हणाले शिरसाट?