आमच्याकडे पोलीस भाड्याने मिळतील, पोलीस स्टेशन सुद्धा बूक करु शकता

नवी दिल्ली | भाड्याने कपडे, गाड्या, घरे आणि माणसे देखील मिळतात. हे सर्वांना माहित आहेच. पण पोलीस (Police) देखील भाड्याने मिळतात, हे जरा विचित्र वाटत आहे ना? पण हे खरे आहे.

केरळमध्ये (Keral) तशी व्यवस्था आहे. केरळ राज्यात तशा प्रकारचा अजब नियमच आहे. यावरुन सध्या वाद देखील सुरु आहे. पोलीस खात्याच्या जुन्या नियमांनुसार, केरळ येथे पोलिसांना भाड्याने ठेवले जाते.

पोलिसांना भाड्याने ठेवण्यासाठी एक ठरलेली रक्कम मोजावी लागते. तसेच पोलीस स्टेशन (Police Station) देखील भाड्याने घेता येते. अशी विचित्र तरतुद केरळ पोलिसांत आहे.

केरळ राज्यात केवळ 700 रुपयांत एका दिवसाच्या तत्वावर काँन्सटेबल (हवालदार) भाड्याने घेता येतो. तर एका ईन्सपेक्टरसाठी (निरीक्षक) रुपये 2560 मोजावे लागतील. आणि संपूर्ण पोलीस स्टेशन भाड्याने घेण्यासाठी 33100 रुपये मोजावे लागतात.

नुकतेच हे प्रकरण चर्चेत आले आहे. कुन्नुर येथील रहिवाशी के. अन्सार यांनी आपल्या मुलीच्या विवाहात व्हिआयपी (VIP) येणार असल्याने त्यांनी 4 काँन्सटेबल भाड्याने घेतले होते.

केरळ पोलिसांनी या प्रकाराला विरोध केला आहे. केरळ पोलीस असोसिएशनने (Kerala Police Association) देखील याला विरोध केला आहे. पोलीस असोसिएशनच्या मतानुसार, केरळ पोलीस कायद्याच्या कलम 62(2) नुसार, कोणीही पोलिसांना वैयक्तित वापरासाठी सक्ती करु शकत नाही.

लग्न, विवाह, शूटींग, सभा, समारंभ आणि वैयक्तिक सुरक्षा यासाठी पोलीस त्यांच्या रँकनुसार भाड्याने घेता येतात. त्यामुळे हा अजब प्रकार लोकांना हवाहवासा वाटत असला, तरी पोलीस त्यावर नाराज आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

जात पडताळणी समितीचा समीर वानखडे यांच्याबाबत मोठा खुलासा

“आमिषाला बळी पडू नका”, माजी नगरसेवकांना पक्षप्रमुखांचा सल्ला

“मला तर हे 2019 ला कळाले होते” – उद्धव ठाकरे

आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर? वाचा काय म्हणाले शिरसाट?

“बाबांनो हात जोडून सांगतो, मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही…”