प्रति शिवसेनाभवन बांधण्यावरुन उदय सामंतांचे स्पष्टीकरण

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगितला. शिवेसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार सध्या त्यांच्या कँपमध्ये आहेत.

त्यानंतर त्यांनी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात खरा शिवसेना पक्ष (Shivsena) म्हणजे आपाला गट असा देखील युक्तीवाद केला. न्यायालयातील खटल्यावर येत्या 22 तारखेला सुनावणी होणार आहे.

आता एकनाथ शिंदे दादर येथे शिवसेना भवन बांधणार आहेत अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे प्रति शिवसेनाभवन बांधणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यावर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एक ट्विट करत या गोंधळाबाबत खुलासा केला आहे. प्रति शिवसेनाभवन नाही, तर जनसंपर्कासाठी आम्ही कार्यालय बांधत असल्याचे ते म्हणाले.

मुंबई दादर येथे प्रति शिवसेनाभवन मा. एकनाथ शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरविला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोद्यांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावे ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनाबद्दल आम्हाला कालही आदर होता, उद्याही राहील, असे ट्विट सामंत यांनी केले.

दादरमध्ये प्रति शिवसेनाभवन उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दिली होती. त्यानंतर शिवसेना आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

दादरमध्ये जागेचा शोधही घेण्यात येत आहे. दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. शिंदे या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये या प्रतिशिवसेना भवनाचे कार्यालय असेल, असे सरवणकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

शिंदे आणि फडणवीस यांनी एक शब्द फेमस केला आहे, तो म्हणजे… – अजित पवार

आमच्याकडे पोलीस भाड्याने मिळतील, पोलीस स्टेशन सुद्धा बूक करु शकता

जात पडताळणी समितीचा समीर वानखडे यांच्याबाबत मोठा खुलासा

“आमिषाला बळी पडू नका”, माजी नगरसेवकांना पक्षप्रमुखांचा सल्ला

“मला तर हे 2019 ला कळाले होते” – उद्धव ठाकरे