“सकाळी 8 वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का?”

मुंबई | बीकेसीत झालेल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केलीये. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.

आम्ही काँग्रेससोबत गेलो, मात्र ते उघड गेलो. आम्ही केलं ते उघड केलं. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर पाप आणि तुमची पहाटेची शपथ काय होती?, असा सवाल त्यांनी केला.

जर पहाटेची शपथ यशस्वी झाली असती तर आज नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत भाजपला डिवचलं. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला.

सकाळी 8 वाजता शपथविधी झाला. त्याला पहाटे कसं म्हणता येईल. सरकार होऊन अडीच वर्ष झाले. आता काही बोलायचं नाही. योग्य वेळी बोलेन, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. त्यावर काही बोलायचं नाही, असं अजित पवार म्हणालेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी मी बोलणार असं सांगितले होते. ते बोलले नसते तर मुख्यमंत्री का बोलत नाही असा अर्थ काढला असता. ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी काय भूमिका मांडायची त्यांचे मत आहे. मला ते काही बोलले त्यावर प्रतिक्रिया देण्यात रस नाही, असंही अजित पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

जगासमोर आणखी एक नवं संकट?; नासाने दिला ‘हा’ इशारा

“बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता, तिथं एकही शिवसैनिक नव्हता” 

Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर 

शरद पवारांचा नरेंद्र मोदींना गंभीर इशारा, म्हणाले… 

काँग्रेसचं मिशन 2024; राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय