मुंबई | शिवसेना आणि भाजप यांच्याच नेहमीच वाद-विवाद होत असलेले पहायला मिळतात. दोन्हीही पक्ष एकमेंकांवर आरोपांचं टीकास्त्र सोडत असतात.
मुंबई येथे बीकेसी मैदानावर शिवेसेनेची संपर्क अभियान अंतर्गत जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलेला पहायला मिळाला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व नकली आहे, असा घणाघात किरीट सोमय्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्वाचं स्वरुपन कसं आहे हेही काल जनतेला समजले आहे. अजान बंद झाली म्हणून मुख्यमंत्र्यांची बोबडी वळली आहे, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं.
बाळासाहेब ठाकरे असली होते मात्र उद्धव ठाकरे नकली आहेत, असा खोचक टोलाही किरीट सोमय्यांनी लगावला आहे.
रश्मी ठाकरे खाेटे वागणार नाहीत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लबाड आहेत. 19 बंगले माझ्याकडे नव्हते असे रश्मी ठाकरेंनी नमूद केलं असल्याचं सोमय्या म्हणाले.
असली आणि नकली याचा लवकरच करारा जवाब मिलेगा, असंही सोमय्या म्हणाले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी कोणता नवा वाद उभा राहणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“सकाळी 8 वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का?”
जगासमोर आणखी एक नवं संकट?; नासाने दिला ‘हा’ इशारा
“बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता, तिथं एकही शिवसैनिक नव्हता”
Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर
शरद पवारांचा नरेंद्र मोदींना गंभीर इशारा, म्हणाले…