कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी

पुणे | कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे हस्तोलंदोन करणं टाळण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी दिला आहे. अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगलीच तयारी केल्याचं पाहायला मिळतंय.

अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी आयोजकांनी हॉटेल परिसरात औषध फवारणी केली. अजित पवारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर लोणावळ्यातील हॉटेल मालक बुचकळ्यात पडले होते. अजित पवार येणार नाही असं समजत त्यांनी फ्लेक्स उतरवला मात्र ऐनवेळी तारांबळ उडाली. तो फ्लेक्स पुन्हा लावला.

लोणावळ्यात एका हॉटेलचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार होतं. मात्र अजित पवार कार्यक्रमाला येणार नसल्याचा त्यांचा समज झाला. अजित पवार पुण्यातून कोरोना संदर्भातील बैठक घेऊन हॉटेलच्या उद्घाटनाला येत असल्याचं समजल्यावर हॉटेल परिसरात औषध फवारणी करण्यात आली.

दरम्यान, दुबईतू पुण्यात आलेलं दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह अढळलं आहे. त्यानंतर पवारांच्या कार्यक्रमाला गर्दी होणं सहाजिक आहे म्हणून कोरोनावर खबरदारीचा उपाय म्हणून आयोजकांनी निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाबाबत असहकार्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही- छगन भुजबळ

-ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढणार; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

-कोरोनामुळं मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावलं

-काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

-पुण्याच्या दाम्पत्याला कोरोनाची लागण, दोघेही पॉझिटिव्ह- राजेश टोपे