नाशिक| पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोना साथीचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. रंगपंचमी करू नका म्हणणार नाही; पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे. खबरदारीचा उपाय म्हणून व्हेंटिलेटर, तसेच खासगी रुग्णालयांचे कक्ष ताब्यात घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
दरम्यान, गेल्या दहा दिवसांत विदेशातील 22 नागरिक नाशिकला आले. त्यापैकी 17 नागरिकांनी स्वतःहून जिल्हा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला असून बाकीच्या पाच नागरिकांबाबत जिल्हा यंत्रणेला कुठलीही माहिती मिळाली नाही. 17 जणांपैकी पाच नागरिकांनी स्वतःहून तपासणीसाठी संपर्क केला. कोरोनाबाबत असहकार्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण नुकतेच दुबईला जाऊन आल्याचीही माहिती मिळत आहे.
दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढणार; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
-कोरोनामुळं मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावलं
-काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम
-पुण्याच्या दाम्पत्याला कोरोनाची लागण, दोघेही पॉझिटिव्ह- राजेश टोपे
-“आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा”