मुंबई | कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल (Viral Video) झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.
बंगळुरुतील या घटनेचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून निषेध केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये कर्नाटकातील गाडी खासगी गाड्यंची तोडफोड केली आहे. तर तिकडे बेळगावातही शिवप्रेमींची अडवणूक करण्यात आली आहे.
शिवाजी गार्डन इथं छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी कर्नाटक पोलिसांनी रोखलं होतं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम बेळगावात लागू करण्यात आलं असून मोठा पोलीस फौजफाटाही या भागात पाहायला मिळतोय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून या घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
कर्नाटक सरकार आणि केंद्रसरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं अजित पवार म्हणालेत.
दरम्यान,कर्नाटकातील पोलिसांना या संपूर्ण घटनेप्रकरणी कायद्याचं उल्लंघन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांना या घटनेकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…तसं महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही’; राज ठाकरेंचा इशारा
अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ कृतीची महाराष्ट्रभर चर्चा
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट”
“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा”
रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…