निवडणूक निकालांच्या सुरुवातीलाच अखिलेश यादवांचं ट्विट चर्चेत, म्हणाले…

लखनऊ | उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल.

सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला कल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतील.

निवडणूक निकालांच्या सुरुवातीलाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं आहे. अखिलेश यादव यांचं हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

अखिलेश यादव यांनी ट्वीट केले की, ”’इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का’ मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि सतर्कतेनं कार्यरत राहिल्याबद्दल सपा-आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे, नेते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे पाईक’ विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततील!”

दरम्यान, पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलंय.

उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

UP Assembly Election Results 2022 | उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर 

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं” 

गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही”