“भाजपमध्ये गेलेल्यांवर ईडीची कारवाई झालेली दाखवा आणि लाख रुपये मिळवा”

औरंगाबाद | शिवसेना पक्षात हिंदुत्वाच्या आणि अजित पवार (Ajit Pawar) निधी देत नसल्याच्या कारणावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले.  त्यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार सध्या भाजपकडे आहेत.

त्यांच्या या पक्षफोडीला महाविकास आघाडीने (MVA) तीव्र विरोध केला. बंडोबांनी दरवेळी आपल्या बंडांची वेगवेगळी कारणे सांगितली. परंतु त्यांची कारणे वैध की अवैध हे आगामी निवडणुका ठरवतील.

काही लेखक आणि राजकारण्यांच्या मते शिंदे गटातील अनेकांना सक्तवसुली संचलनालयाच्या (Enforcement Directorate) नोटीसा आल्या आहेत. आणि त्यामुळे आपली अवैध संपत्ती आणि भानगडी चव्हाट्यावर येऊ नये यासाठी त्यांंनी भाजपात उडी घेतली.

शिवसेनेची तोफ असणारे आणि शिवसेनेची भूमिका सतत मांडणारे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने नुकतीच कारवाई करत त्यांना तुरुंगात डांबले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाया करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सचिवांनी लावलेल्या बॅनरची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. या बॅनरच्या माध्यामातून ईडी आणि भाजपला लक्ष करण्यात आले आहे.

भाजप नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा. अशा आशयाचे फ्लेक्स सध्या औरंगाबाद शहरात झळकत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP Young Wing) प्रदेश सचिव अक्षय पाटील (Akshay Patil) यांनी त्यांच्या फोटो आणि संपर्क क्रमाकांसह हे बॅनर संपूर्ण शहरात झळकवले आहे. यामुळे आता भाजप राष्ट्रवादी पक्षाला काय उत्तरे देणार? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या – 

“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”

“कोण आदित्य ठाकरे, तो फक्त एक आमदार आहे”

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, वाचा सविस्तर

‘फक्त 11 लाखांसाठी का छळ चालवलाय?’, राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन संतापल्या

भागवतांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘मोहन भागवत मला आदर्श आहेत’