नवी दिल्ली | उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन त्यांच्या विचित्र निर्णयांमुळे व वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यात किम जोंग उन यांनी कोरोना व्हायरस बद्दल एक अजब-गजब वक्तव्य केलं आहे.
देशात कोरोनाचा प्रसार हा एलियनद्वारे झाल्याचं वक्तव्य किम जोंग उन यांनी शुक्रवारी केलं आहे. देशातील पहिलं कोरोनाचं प्रकरण एलियनद्वारे पसरलं असल्याचा दावा किम जोंग उन यांनी केला आहे.
एलियन्सने कोरोना व्हायरस दक्षिण कोरियाच्या सीमेवरून फुग्यांमध्ये टाकला होता. त्यामुळेच त्यांच्या देशात कोरोनाचा प्रसार असल्याचा दावा किम जोंग उन यांनी केला आहे.
तपासणीनंतर असं आढळून आलं आहे की एलियन्सने फुग्यांमध्ये व्हायरस भरून दक्षिण कोरियाच्या सीमेवरून देशात टाकलं असल्याचा दावा किम जोंगने केला. बीबीसीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
सीमा रेषा आणि सीमेवरील भागांना वारा आणि इतर हवामानातील घटना तसेच फुग्यांमधून येणाऱ्या परदेशी वस्तूंशी व्यवहार करताना सावध राहण्याचे आदेश उत्तर कोरियात देण्यात आले आहेत.
उत्तर कोरियातील एक 18 वर्षीय सैनिक अज्ञात सामग्रीच्या संपर्कात आला आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. तर सध्या किम जोंग उन यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वांचं प्रेम जर क्वचित कुणाला लाभलं असेल तर मला लाभलंय- उद्धव ठाकरे
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल वाटलं होतं पण…’, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
‘हात जोडून विनंती आहे माझ्यावरचा राग…’, शिंदे सरकारला उद्धव ठाकरेंचं जाहीर आवाहन
फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…
“बिचारे देवेंद्र फडणवीस…, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला”