अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दहा लाखांचा दंड

मुंबई | मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. यात अलका कुबल, विजय पाटकर, प्रिया बेर्डे आणि माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांचा समावेश आहे.

पुणे महामंडळाच्या वतीन मानाचा मुजरा या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी बोगस आणि आनावश्यक खर्च केल्याप्रकरणी 10 लाख रुपये भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय चित्रपट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने 2012 साली पुण्यात मानाचा मुजरा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी 52 लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

त्यावेळी तत्कालिन संचालकांनी बोगस खर्च दाखवून पैसे लाटल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता त्यांना धर्मदाय आयुक्तांनी दहा लाख दंड ठोठावला होता.

मानाचा मुजरा कार्यक्रमाला लागणाऱ्या खर्चाला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती. मात्र सभासदांनी त्यावर आक्षेप घेतला होता. कार्यक्रमासाठी केलेला खर्च चुकीच्या पद्धतीने झाला असल्याने तो वसूल करायला हवा, अशी मागणी करण्यात आली होती.

धर्मदाय आयुक्तांच्या या दंडाच्या मागणीला माजी संचालकांनी न्यायालयात आव्हान केले होते. त्यावरील याचिका न्यायालयाने फेटाळत सर्वांना दहा लाख दंड न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

सहा आठवड्यात ही रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचप्रमाणे ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अनेक सभासदांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

ही रक्कम भरण्यासाठी महामंडळाच्या एकूण 15 सदस्यांची नावे आहेत. माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, विजय पाटकर, सतीश बीडकर, मिलिंद अष्टेकर, सुभाष भुरके, अलका कुबल, प्रिया बेर्डे, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रर्णादे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामतीकर आणि रविंद्र बोरगावकर यांचा या यादीत समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“…तर तो भाजपचा निर्णय असेल”; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर आशिष शेलारांची स्पष्टोक्ती

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला हॉलिवूडमधून पाठिंबा; अभिनेत्याने केले ट्वीट

“आम्हाला गद्दार म्हणण्यापूर्वी…”; अजित पवरांना शंभुराज देसाईंचा इशारा

नाना पटोलेंची एकनाथ शिंदेवर मोठी टीका; म्हणाले, सध्याचे नवीन हिंदूहृद्यसम्राट…

अखेर अशोक गहलोत अध्यक्षपदाचे उमेदवार; आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण?