“देवेंद्र फडणवीसांना महाविकास आघाडीने ब्राम्हण म्हणून हिणवले, त्याच ब्राम्हणाने मराठ्यांची…”; तानाजी सावंतांचे वक्तव्य चर्चेत

मुंबई | राज्यात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) असा संघर्ष सुरु आहे. शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

उस्मानाबाद येथे हिंदुगर्वगर्जना या यात्रेदरम्यान त्यांनी भाषण करताना, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना ते ब्राम्हण असल्याच्या मुद्द्यावरुन हिणविण्यात आल्याचा संबंध दिला.

ज्या नेत्याला तुम्ही ब्राम्हण म्हणून हिणविण्यात आले, त्याच नेत्याने मराठ्यांची झोळी भरली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणादरम्यान केले.

मराठा समाजाचे नेते असलेल्या तानाजी सावंत यांनी उस्मानाबादमध्ये संवाद साधताना, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले.

2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आरोप केले. त्यांना महाविकास आघाडीने भरपूर त्रास दिला. मराठ्यांनी मराठा क्रांती मोर्चा काढला, पण त्याला यांंनी ‘मुकामोर्चा’ म्हणत चेष्टा केली. मराठ्यांचा अपमान देखील केला, असे सावंत म्हणाले.

फडणवीसांना विरोधकांनी जातीवरुन हिणविले पण त्यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले, असे देखील सावंत म्हणाले. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर सहा महिन्यात हे आरक्षण गेल्याचे सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दहा लाखांचा दंड

“…तर तो भाजपचा निर्णय असेल”; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर आशिष शेलारांची स्पष्टोक्ती

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला हॉलिवूडमधून पाठिंबा; अभिनेत्याने केले ट्वीट

“आम्हाला गद्दार म्हणण्यापूर्वी…”; अजित पवरांना शंभुराज देसाईंचा इशारा

नाना पटोलेंची एकनाथ शिंदेवर मोठी टीका; म्हणाले, सध्याचे नवीन हिंदूहृद्यसम्राट…