आत्ताची सर्वात मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियमावलीत बदल करण्याचा सपाटा ठाकरे सरकारनं लावला होता. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोनाने (Corona) थैमान घातल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे सरकारने काही गाईडलाईन्स आखल्या होत्या. अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

केंद्र सरकारने देखील काही दिवसांपासून अनेक निर्बंध काढून टाकले आहे. फक्त मास्क आणि सामाजिक अंतर पाळणं बंधनकारक ठेवण्यात आलं आहे.

राज्य सरकारनं कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याची घोषणा एकमतानं केली आहे, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. परिणामी सर्वांना दिलासा मिळाला आहे.

गुढीपाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्सहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे, तर ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरू नये. म्हणजे मास्क हा ऐच्छिक असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही अशी टीका भाजपकडून करण्यात येत होती. त्याला ठाकरे सरकारनं उत्तर दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…

 “आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”

 आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!