यंदाचं वरीस महागाईचं! उद्यापासून टीवी, एसी, फ्रिजसह ‘या’ गोष्टी महागणार

मुंबई |  नवीन आर्थिक वर्ष आणि केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या काही बदलांमुळं एप्रिलपासून महागाई वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं इंधनाचे दर वाढत आहेत. परिणामी इतर गोष्टी महागण्याची शक्यता आता जवळपास खरी होणार आहे.

अर्थसंकल्पात अनेक उत्पादन घटकांवरील आकारण्यात येणाऱ्या करामध्ये केंद्र सरकारनं वाढ केली आहे. महागाई वाढण्यास वाढत असलेले कर कारणीभूत ठरणार आहेत.

1 एप्रिलपासून सरकारनं एल्युमिनीयमच्या अयस्क आणि कंसन्ट्रेटवर 30 टक्के शुल्क आकारण्याचं जाहीर केलं आहे. परिणामी टीवी, एसी, फ्रिज, कंम्प्रेसर महाग होणार आहेत.

एलईडी बल्ब उत्पादनात लागणाऱ्या घटकांवर मुळ करासह 6 टक्के प्रतिपुर्ती कर लागू करण्याची केंद्र सरकार तयारी करत आहे. परिणामी 1 एप्रिलपासून एलईडी महाग होणार आहेत.

चांदी आणि स्टीलपासून बनवण्यात येणारी भांडी यावर देखील कर आकारण्यात येणार असल्यानं चांदी, स्टील असलेली भांडी महाग होणार आहेत.

मोबाईल उत्पादनात उपयोगी पडणाऱ्या प्रिंटेड सर्किट बोर्डच्या किंमती देखील वाढणार असल्यानं मोबाईल फोन कंपन्या मोबाईलच्या किंमतीत वाढ करतील.

टेलिकाॅम कंपन्या देखील सुविधा महाग करण्याच्या तयारीत आहेत. ईअरबड्स आणि हेडफोन्स देखील महाग होतील. परिणामी सर्वांनी आपल्या खिशात जास्त पैसे ठेवणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…

 “आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”

 आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!