‘एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट होता, तरीही…’; बंडखोर आमदाराच्या आरोपाने खळबळ

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंचा खून करण्याचा प्रयत्न होता का? असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा न देण्याचा आदेश हा वर्षा बंगल्यावरुन आला होता असा गौप्यस्फोटही सुहास कांदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

याकाळात माओवाद्यांनी एकनाथ शिंदेंची हत्या करण्याचा कट रचला होता. हे माहित असतानाही एकनाथ शिंदेंना तेव्हाच्या सरकारकडून झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आलेली, असं कांदेंनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरुन सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यावेळेसचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन आला. यात झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला.

जे हिंदुत्वाविरोधात होते, त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली असा सवालही त्यांनी केला. याकूब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अस्लम शेख, नवाब मलिक यांच्यासोबत सत्तेत बसायचे का, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना भेट घेऊन निवेदन देत प्रश्न विचारणार असल्याचं म्हटलं. सुहास कांदे यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत आमचं काय चुकलं, असे प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारले होते. आदित्य ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कांदेंनी सांगितल्यानं आदित्य ठाकरेंच्या समर्थनासाठी जमलेले शिवसैनिक संतप्त झाले.

मनमाड येथील मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा सामना करायला निघालेल्या आमदार सुहास कांदे यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. पिंपळगाव टोल नाक्यावर शिवसैनिक आणि आमदार सुहास कांदे आमने सामने आलेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंनी वडिलांचा 90% पक्ष संपवला, आदित्यने ठरवलं पप्पा उरलेला 10% मी संपवणार”

विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोजने सोशल मीडियावर आग, चर्चा तर होणारच; पाहा फोटो

‘आयत्या बिळावर नागोबा’, ओबीसी आरक्षणावरून भाजप-शिवसेनेत जुंपली