मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर शिवसेना डबघाईला आली आहे. 40 आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे अनेक आजी-माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुख व खासदारही शिंदे गटात गेले.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेनेत इतकी मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या प्रतिष्ठेला तडा गेला.
शिवसेनेची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी व पक्ष वाचवण्याठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. तर यासाठी आदित्य ठाकरेंनी शिवसंपर्क अभियान सरू केलं असून राज्यभर दौरे करणार आहेत.
आदित्य ठाकरेंच्या भिवंडीतील सभेत कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. मात्र, सभा संपली आणि संध्याकाळीच भिंवडीतील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले.
शिवसेनेतील गळती कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. अँकर अंजना कश्यपजी बरोबर बोलल्या होत्या आदित्य हा महाराष्ट्राचा पप्पू आहे, असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी वडिलांचा 90 टक्के पक्ष संपवला आणि आदित्यने ठरवलं उरलेला 10 टक्के मी संपवणार प्लिज, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली. निलेश राणेंनी ट्विट करत ठाकरे पिता-पुत्राला धारेवर धरलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या बंडखोरीपासून राज्यातील वातावरण अधिकच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाची चिखलफेक पाहायला मिळत आहे.
अँकर अंजना कशपजी बरोबर बोलल्या होत्या आदित्य हा महाराष्ट्राचा पप्पू आहे, उद्धव ठाकरे यांनी वडिलांचा 90% पक्ष संपवला, आदित्यने ठरवलं पप्पा उरलेले 10% मी संपवणार please. https://t.co/wv5BOTq7Dk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 22, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी
आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
रणवीर सिंगच्या न्यूड फोटोजने सोशल मीडियावर आग, चर्चा तर होणारच; पाहा फोटो
‘आयत्या बिळावर नागोबा’, ओबीसी आरक्षणावरून भाजप-शिवसेनेत जुंपली
बंगला, पगार ते सुरक्षा; राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूंना मिळणार ‘या’ सुविधा