शिवसेनेत मोठं वादळ?; एकनाथ शिंदेसोबत 11 नाहीतर ‘इतके’ आमदार हॉटेलमध्ये

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मते फोडत पाचवी जागा निवडून आणली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास 20 मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरलेली असतानाच शिवसेनेचे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता एकनाथ शिंदे 11 आमदारांना नाहीतर 25 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले असल्याची माहिती समोर आलीये.

गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.

हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे.

सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचं संख्याबळ हे 134 झालं आहे. त्यामुळे भाजप आता अविश्वास ठराव मांडेल, अशी चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा….”; शिवसेना नेत्याने सांगितलं नेमकं काय झालं? 

मोठी बातमी! 11 आमदारांसह नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे अखेर गुजरातमध्ये सापडले 

“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार” 

मोठी बातमी! परमबीर सिंग यांचा सीबीआयला दिलेल्या जबाबात अत्यंत खळबळजनक दावा 

विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…