शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता!

मुंबई | एकनाथ शिंदे आमदारांसह गायब असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशात काँग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून थोरात राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आलीये.

आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. यात काँग्रेसची 3 मतं फुटल्याचे समोर आले आहे. कारण, काँग्रेसला 44 पैकी फक्त तीन मते मिळाली आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. शिवेसेनेचे तब्बल 25 आमदार नॉट रिचेबल असून ते सध्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये आहेत. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील राजन विचारे (Rajan Vichare) आणि डॉ, श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे नॉट रिचेबल आहेत. यापैकी श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पूत्र आहेत. ते सध्या दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं खासदारांना तातडीनं मुंबईत बोलावलं आहे.त्यावेळी हे खासदार नॉट रिचेबल असल्यानं शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा….”; शिवसेना नेत्याने सांगितलं नेमकं काय झालं? 

मोठी बातमी! 11 आमदारांसह नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे अखेर गुजरातमध्ये सापडले 

“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार” 

मोठी बातमी! परमबीर सिंग यांचा सीबीआयला दिलेल्या जबाबात अत्यंत खळबळजनक दावा 

विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…