अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड!

मुंबई |  मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांचं आज गोरेगावातल्या मनसेच्या अधिवेशनात अधिकृतपणे लॉन्चिंग झालं आहे. त्यांची आज मनसेच्या नेतेपदी निवड झाली आहे. बाळा नांदगावकर यांनी ही निवड घोषित केल्याचं मनसेच्या अधिवेशनाच्या मंचावरून सांगितलं.

अमित ठाकरे अनेकदा आंदोलनांमधून महाराष्ट्रासमोर आले आहेत परंतू आता त्यांचं अधिकृरित्या लॉचिंग झाल्याने ते आता मनसेचे नेते म्हणून महाराष्ट्रासमोर येतील.

अमित यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मनसेच्या मंचावरून शिक्षणाचा ठराव मांडला. दप्तराचं ओझं कमी व्हावं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणांना मदत मिळावी, असे मुद्दे त्यांनी आपल्या ठरावात मांडले.

दरम्यान, अमित यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मंचाच्या बाजूला बसलेल्या राज ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी बातचित केली. नवी जबाबदारी मिळाल्यानंतर आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-