अमित शहांची लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांवर मोठी टीका; म्हणाले, लालूजींनी आयुष्यभर…

मुंबई | मागील महिन्यात भाजपसोबत असलेली आघाडी तोडत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सत्तापालट केला. त्यांनी भाजपसोबत असलेली युती संपुष्टात आणूण रादज आणि काँग्रेससोबत घरोबा केला.

त्यानंतर त्यांनी राजद (RJD) , काँग्रेस (INC) आणि संयुक्त जनता दलाच्या (JDU) महागठबंधन सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून भाजप त्यांच्यावर उखडला आहे.

नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या सरकारने बिहार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. यावेळी भाजपच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर (Floor Test) बहिष्कार टाकला, आणि सभात्याग केला.

आज भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान बनण्याच्या हव्यासापोटी नितीश कुमारांनी पाठीत खंजीर खुपसला, असे शहा म्हणाले.

अमित शहा शुक्रवारी पूर्णिया येथे जनभावना रॅलीला संबोधीत करत होते. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यंमत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि राजदचे नेते, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर टीका केली.

लालू प्रसाद यादव यांनी आपल्या सबंध हयातीत फक्त भांडणे लावण्याची कामे केली, असे शहा म्हणाले. बिहारची भूमी नेहमीच परिवर्तन घडवून आणण्यात पुढे राहिली आहे, त्यामुळे ती कुमारांना देखील बाहेर फेकणार आहे, असे शहा यावेळी म्हणाले.

आज मी सीमावर्ती जिल्ह्यात आलो आहे, त्यामुळे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांच्या पोटात दुखत आहे. त्यांना वाटत आहे की, मी काहीतरी भांडणे लावून जाणार आहे.

पण मला लालू प्रसादांना सांगावेसे वाटते की, भांडणे लावण्यासाठी माझी गरज नाही. तुम्ही त्यासाठी पुरेसे आहात. कारण, तुम्ही आयुष्यभर लोकांमध्ये भांडणे लावण्याचे काम केले आहे, असे शहा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

न्यायालयाने फटकारल्यावर शिंदे यांच्या गटाकडून पहिली प्रतिक्रिया; दादा भुसे म्हणाले…

नवनीत राणांना लवकरच अटक होणार, न्यायालयाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा वाद निकालात; शिवाजी पार्कवर कोण घेणार, ‘दसरा मेळावा’?

फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निकाल जाहीर

“… तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल”; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा