दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी अमित शहांनी उचललं मोठं पाऊल!

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नये.

दिल्लीत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दिल्लीतील हिंसाचारानंतर लगेचच अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून देशभरात राजकरण तापलं आहे. या घटनेबाबत केंद्रातील विद्यमान सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत. यावर आता भाजपकडूनही उत्तर दिलं जात आहे.

दिल्लीतील पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते, त्यामुळेच केंद्र विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मात्र याला उत्तर देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वतीने एक पत्र जारी करण्यात आले असून त्यात काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींचा उल्लेख करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘राज्यातील वातावरण बिघडवाल तर…’; वळसे-पाटलांचा गंभीर इशारा

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी