“पाकव्याप्त काश्मिरचा वाद देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंमुळेच”

मुंबई |  पाकव्याप्त कश्मीरचा वाद माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यामुळेच निर्माण झाला आहे. त्यामुळेच काश्मीरमधील कलम 370 रद्द करून भाजपने भारत एकसंध ठेवलं. काँग्रेससाठी कलम 370 हा राजकारणाचा मुद्दा होता मात्र आमच्यासाठी अस्मितेचा मुद्दा होता, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

गोरेगावच्या नेस्को संकुलात कलम 370 तसंच जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीबाबत गृहमंत्री अमित शहा यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत काँग्रेसवर टीका केली.

काश्मीरमध्ये दहशवादामुळे आतापर्यंत 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काश्मिरात तीन-चार कुटुंबांच्या हाती सत्ता एकवटली होती. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आता चौकशी होईल, असं ते म्हणाले.

कलम 370 ला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी, असं आवाहन शहा यांनी उपस्थितांना केलं.

दरम्यान, अमित शहा यांच्या भाषणावर मात्र काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. शिक्षण, बेरोजगारी, मंदी, विकासाची कामे यावर जरा बोला, असा सल्ला काँग्रेसने अमित शहांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-