दिल्ली निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली; अमित शहांची कबुली

नवी दिल्ली |  ‘गोली मारो’सारख्या भाजपच्या विखारी प्रचाराला दिल्लीकरांनी उत्तर देत आम आदमी पक्षाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आणि 70 पैकी 62 जागांवर आपच्या उमेदवारांना विजयी केलं. भाजपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत लाजीरवाणा पराभव झाला. या निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली, असा कबुलीनामा गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

गोली मारो आणि इंडिया-पाक मॅचसारख्या वक्तव्यांनी आमचा घात केल्याचंही अमित शहा म्हणाले आहेत. प्रचारात आम्ही अशी भाषा वापरायला नको होती, असंही ते म्हणाले आहेत.

प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते. दिल्लीच्या निवडणुकीने आम्हाला खूप काही शिकवलंय. या निवडणुकीत आमचा पराभव का झाला? याचं चिंतन आम्ही करू, असं ते म्हणाले.

दरम्यान, दिल्ली निवडणुकीच्या काळात शाहीनबागेत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू होतं. त्यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी भाजपचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी या देशद्रोह्यांना गोळ्या मारल्या पाहिजेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यांचं हेच वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर

-शरद पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र

-खुशखबर…. आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता!!

-धक्कादायक… महावितरणकडून शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट!

-कुणी जेलमध्ये टाकायची भिती घातली तर पवारसाहेबांना आठवा- रोहित पवार