आम्ही जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही- अमित शहा

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपला चारी मुंड्या चित करत जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर जेवढी आपच्या विजयाची चर्चा आहे तेवढीच चर्चा भाजपच्या पराभवाची आहे. मात्र आम्ही जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही, असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत.

भाजप विचारधारा आणि पक्षाचा विस्तार यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीत हरणं आणि जिंकणं यावर आम्ही विश्वास ठेवत नाही किंवा जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही, असं शहा म्हणाले.

राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्यापासून मी पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक निवडणुकीत उतरत असतो. दिल्लीत पहिल्यांदाच आमच्याविरोधात निकाल लागला असं नाही. यापूर्वीही आम्ही पराभव पाहिला आहे. मी भाजपचा सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता असून पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी नेहमी तत्पर असतो, असं शहा म्हणाले.

दुसरीकडे दिल्लीच्या निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली. तसंच गोली मारो आणि इंडिया-पाक मॅचसारख्या वक्तव्यांनी आमचा घात केला, असा कबुलीनामा अमित शहा यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्ली निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली; अमित शहांची कबुली

-‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर

-शरद पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र

-खुशखबर…. आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता!!

-धक्कादायक… महावितरणकडून शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट!