“पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता असेल तर काहीही अशक्य नाही”

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी लोकांना द काश्मीर फाइल्स पाहण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत काश्मीरमध्ये अत्याचार आणि दहशतवाद कसा पसरला होता हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे, असं अमित शहा म्हणाले.

अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये 330 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेऴी अमित शहा बोलत होते.

तुम्ही सर्वांनी काश्मीरवरील चित्रपट पाहिला आहे का? ज्यांनी तो पाहिला नाही त्यांनी तो पाहा आणि तुम्हाला कळेल की, काँग्रेसच्या राजवटीत काश्मीरमध्ये अत्याचार आणि दहशतवाद कसा पसरला होता, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे, विकास कामे ठळकपणे दिसून येत आहेत आणि देश जगासाठी उत्पादन केंद्र बनला आहे. पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर, देशातील जनतेला कळलं की जर आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता असेल तर काहीही अशक्य नाही, असं म्हणत अमित शहांनी मोदींचं कौतुक केलं आहे.

अमित शहांनी यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. महामारीच्या काळातही राहुल गांधी फक्त ट्विट करत होते बाती काहीही त्यांनी केलं नाही, अशी टीका अमित शहांनी राहुल गांधींवर केलीये.

75 वर्षात देशभरातील खेड्यापाड्यात सर्व घरांमध्ये शौचालये बांधण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत इतर कोणत्याही पक्षात नव्हती. पीएम मोदींनी ते केलं. लोकांना वीज दिली, खेड्यापाड्यात गॅस सिलिंडर दिले, लोकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचारही मिळाले, असं शहांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…हे ऐकून मोदींची दोन तासांचीही झोप उडाली असेल” 

“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात” 

गरिबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 

IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव 

‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ