“…हे ऐकून मोदींची दोन तासांचीही झोप उडाली असेल”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत असताना 2 तास झोप न येण्यासाठी पंतप्रधान साधना करत आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. याचा राऊतांनी जोरदार समाचार घेतला आहे.

नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही वक्तव्ये ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना हे इतके मानसिक बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे, असा सणसणीत टोला राऊतांनी पाटलांना लगावला.

‘मालिक तो महान है, बस चमचों से परेशान हैं’ सध्या आपल्या देशात हेच वातावरण दिसत आहे. देशातील राजकारणात सरळ दोन गट पडले आहेत. भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत, असं राऊत म्हणालेत.

भांड, भाट आणि चमचे ज्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सामील केले जातात ते राज्य रसातळाला जाते आणि राजा विश्वास गमावून बसतो. सध्या आपले पंतप्रधान मोदी अशाच चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेस काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. फक्त नामांतर झाले. काम तेच’ असा सणसणीत टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

मोदींना खिचडी आवडते म्हणून भक्तांनाही खिचडी आवडू लागली. मोदींनी चहा विकला म्हणून भक्तांनी चहाची विक्री सुरू केली. या भक्तीस तोड नाही. आता तर कोथरुडचे पाटील मोदींच्या झोपेवर संशोधन करायला निघाले, असं म्हणत राऊतांवर चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली आहे.

मोदी यापुढे 24 तास जागे राहतील. म्हणजे त्यांचे भक्तही झोपणार नाहीत. उलथापालथ जगाचा इतिहास चमचेगिरीच्या असंख्य कथा-दंतकथांनी भरला आहे’ असा टोलाही राऊतांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात” 

गरिबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 

IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव 

‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ 

  ‘कुणीही कायदा हातात घेतला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा