‘आरे’तील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात अमित ठाकरे मैदानात

मुंबई : मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील  2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला. रविवारी हजारो मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन याचा निषेध केला.  यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढे आले असून त्यांनी जनतेला सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय.

82 हजार लोकांनी याविरोधात तक्रारी केल्या. एवढ्या लोकांच्या तक्रारी असतानाही आपण झाडे कापण्याचा निर्णय घेत असू तर संशय निर्माण होणारच, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, असं आवाहन अमित ठाकरेंनी केलंय.

https://www.facebook.com/amitthackerayofficial/videos/486649838793186/